“आई-बहिणीवरून शिव्या द्यायची…”, अमिशा पटेलने सांगितला फराह खानसह काम करण्याचा अनुभव
फराह खान बॉलीवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शिका व कोरिओग्राफर आहे. तिच्या यूट्यूब ब्लॉगमुळे ती चर्चेत आहे. नुकतीच तिने अभिनेत्री अमिशा पटेलची भेट घेतली. अमिशाने 'कहो ना प्यार है' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान फराहने तिला व हृतिकला खूप ओरडल्याचं सांगितलं. फराहने मात्र हृतिकला नाही, फक्त अमिशालाच शिव्या दिल्याचं स्पष्ट केलं. 'कहो ना प्यार है' २००० साली प्रदर्शित होऊन आजही लोकप्रिय आहे.