“डेव्हिडनं गोविंदाच्या मनात विष कालवलं”, प्रसिद्ध निर्मात्याचं वक्तव्य; म्हणाले…
प्रसिद्ध अभिनेता गोविंदा ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेता होता. अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करूनही, तो गेल्या काही वर्षांत कोणत्याही नवीन चित्रपटात दिसला नाही. चित्रपट निर्माते पहलाज निहलानी यांनी एका मुलाखतीत गोविंदाच्या करिअरबद्दल वक्तव्य केले आहे. त्यांनी गोविंदाच्या भोळेपणामुळे आणि चुकीच्या वातावरणामुळे त्याचे करिअर संपल्याचे म्हटले आहे. डेव्हिड धवनमुळे गोविंदा आणि पहलाज यांच्यात वाद निर्माण झाल्याचेही त्यांनी सांगितले.