परीक्षा द्यायला गेलेल्या बॉलीवूड अभिनेत्याभोवती जमली चाहत्यांची गर्दी, साधेपणाचं कौतुक
बॉलीवूड अभिनेता हर्षवर्धन राणे नुकताच मानसशास्त्राच्या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर गेला होता. त्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी, विशेषतः मुलींनी गर्दी केली. यावेळी त्याने अनेकांना स्वाक्षरी दिली आणि चाहत्यांबरोबर फोटोही काढले. याबद्दल त्याचं कौतुक होत आहे. हर्षवर्धनने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत परीक्षा चांगली झाल्याचे सांगितले. दरम्यान, 'सनम तेरी कसम' चित्रपटामुळे प्रसिद्ध झालेला हर्षवर्धन सध्या शिक्षणातही लक्ष देत आहे.