‘हेरा फेरी ३’ वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, परेश रावल यांच्याबद्दल म्हणाला…
सध्या 'हेरा फेरी ३'ची जोरदार चर्चा आहे. परेश रावल यांनी 'बाबुराव आपटे'ची भूमिका सोडल्याने चाहत्यांची निराशा झाली आहे. अक्षय कुमारच्या निर्मित संस्थेने त्यांच्यावर २५ कोटींचा दावा ठोकला आहे. अशातच 'हाउसफुल्ल ५'च्या ट्रेलर लाँचला अक्षय कुमारने परेश रावल यांना मूर्ख म्हणणं चुकीचं असल्याचं सांगितलं. आम्ही खूप चांगले मित्र आहोत आणि ते खूप कमाल अभिनेते आहेत. हे प्रकरण न्यायालयात असल्याने याविषयी अधिक बोलणार नसल्याचंही त्याने यावेळी स्पष्ट केलं.