‘हेरा फेरी’ आहे ‘या’ मल्याळी सिनेमाचा हुबेहूब रिमेक, स्वत: दिग्दर्शकाने केला खुलासा
प्रियदर्शन हे बॉलीवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शक आहेत. त्यांनी 'हेरा फेरी' आणि 'फिर हेरा फेरी' या गाजलेल्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. 'हेरा फेरी' मल्याळी चित्रपट 'रामजी राव'चा रिमेक आहेत. प्रियदर्शन यांनी सांगितलं की, रिमेक बनवताना मूळ सिनेमा कलाकारांना दाखवला नाही. त्यांच्या मते, ९०% दाक्षिणात्य चित्रपटांचे रिमेक फ्लॉप होतात कारण ते हिंदी संस्कृतीशी जोडलेले नसतात.