राष्ट्रगीत सुरू असताना केलेल्या ‘त्या’ चूकीमुळे अभिनेत्रीची बहीण ट्रोल; पाहा व्हिडीओ
स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. बॉलीवूड अभिनेत्री शमिता शेट्टीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात ती राष्ट्रगीताच्या वेळी शांतपणे उभी न राहता हालचाल करताना दिसते. यामुळे ती टीकेची धनी बनली आहे. अनेकांनी तिच्या वागण्यावर नाराजी व्यक्त केली आहे. याउलट, शिल्पा शेट्टीच्या लहान मुलीचं राष्ट्रगीतावेळी शिस्तीत उभं राहिल्याबद्दल कौतुक होत आहे.