जॅकलिन फर्नांडिसनं जपलं समाजभान, दुर्मिळ आजार असलेल्या ‘त्या’ चिमुकल्याची घेतली जबाबदारी
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने अलीकडेच 'हायड्रोसेफालस' या दुर्मिळ आजाराने ग्रस्त असलेल्या एका चिमुकल्याची भेट घेतली आणि त्याच्या उपचाराचा खर्च उचलण्याची जबाबदारी घेतली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ती मुलाबरोबर खेळताना दिसते. जॅकलिनच्या या कृतीचं अनेकांनी कौतुक केलं आहे. जॅकलिन विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेते आणि लवकरच 'वेलकम टू द जंगल' या चित्रपटात झळकणार आहे.