“‘छावा’ व ‘द काश्मीर फाईल्स’सारखे चित्रपट कधीच बनवणार नाही”, जॉन अब्राहमचं वक्तव्य
जॉन अब्राहम सध्या 'तेहरान' चित्रपटाच्या कामात व्यग्र आहे. त्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत 'छावा' आणि 'द काश्मीर फाईल्स' सारखे चित्रपट कधीच बनवणार नसल्याचं म्हटलं आहे. त्याने सेन्सॉरशिपबद्दलही मत मांडलं आणि उजव्या विचारसरणीचे चित्रपट प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय होत असल्याची चिंता व्यक्त केली. 'छावा' चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असून 'द काश्मीर फाईल्स' काश्मिरी हिंदूंच्या निर्वासनाची कहाणी सांगतो.