“खोट्या बातम्या…”, अपघाताच्या अफवा पसरवणाऱ्यांबद्दल लोकप्रिय अभिनेत्रीने व्यक्त केला संताप
लोकप्रिय अभिनेत्री काजल अग्रवलबद्दल सोशल मीडियावर तिचा अपघात झाल्याची खोटी अफवा पसरवण्यात आली होती. यावर काजलने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. तिने ही अफवा खोटी असल्याचं सांगत, अशा अफवांवर विश्वास ठेवू नये आणि पसरवू नये अशी विनंती केली आहे. काजल अग्रवाल हिंदी व दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.