“पापाराझी अंत्यविधीलासुद्धा फोटो मागतात”, काजोलने व्यक्त केला राग; म्हणाली, “खूप विचित्र…”
लोकप्रिय अभिनेत्री काजोलने ९०च्या दशकात प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं होतं. सध्या ती तिच्या आगामी 'माँ' चित्रपटामुळे चर्चेत आहे. प्रमोशनदरम्यान दिलेल्या मुलाखतीत तिने पापाराझींबद्दल मत व्यक्त केलं. काजोल म्हणाली की, पापाराझी कलाकारांच्या प्रतिक्रियांचा गैरफायदा घेतात आणि काही ठिकाणी त्यांची उपस्थिती अनावश्यक असते. 'माँ' चित्रपटात ती मुख्य भूमिकेत असून तो २७ जूनला प्रदर्शित होणार आहे.