“तोंडात मधमाशी गेली अन्…”, कंगनाची करिश्माच्या पूर्वाश्रमीच्या पतीच्या निधनाबद्दल पोस्ट
बॉलीवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचे माजी पती आणि उद्योगपती संजय कपूर यांचे वयाच्या ५३ व्या वर्षी लंडनमध्ये निधन झाले. पोलो खेळताना मधमाशीच्या दंशामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या अकस्मात मृत्यूमुळे कुटुंबीय आणि मित्रमंडळींना धक्का बसला आहे. अभिनेत्री कंगना रणौतनेही या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.