आलिया भट्टला चित्रपटाची ऑफर दिल्यानंतर महेश भट्ट यांनी संजय लीला भन्साळींना दिलेली ताकीद
संजय लीला भन्साळी हे बॉलीवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. आलिया भट्टने त्यांच्या 'गंगूबाई काठियावाडी' चित्रपटात काम केले आहे आणि आता ती त्यांच्या 'लव्ह अँड वॉर' चित्रपटात दिसणार आहे. महेश भट्ट यांनी एका मुलाखतीत सांगितले की, आलिया लहान असताना भन्साळी यांनी तिला 'बालिका वधू' चित्रपटासाठी विचारले होते. महेश भट्ट यांनी भन्साळींना त्यावेळी ताकीद दिलेली.