“सलमान खानबरोबर पुन्हा चित्रपट करणार नाही”, महेश मांजरेकर असं का म्हणाले?
महेश मांजरेकर यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सलमान खानसोबत पुन्हा काम न करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं. 'अंतिम' सिनेमात त्यांनी एकत्र काम केलं होतं, पण सलमानला सिनेमा कळतो असं वाटतं, ज्यामुळे दिग्दर्शनात हस्तक्षेप होतो, असं महेश म्हणाले. तरीही, सलमान माणूस म्हणून खूप चांगला आहे आणि मदतीसाठी तत्पर असतो, असंही त्यांनी नमूद केलं.