रात्री ३ वाजता जाग यायची अन्…; दिग्दर्शकानं सांगितला ‘मुंज्या’च्या शूटिंगदरम्यानचा अनुभव
मराठी दिग्दर्शक आदित्य सरपोतदारने 'मुंज्या' या हॉरर सिनेमाच्या शूटिंगदरम्यान कोकणातील गुहागरमध्ये भीतीदायक अनुभव घेतला. त्याने सांगितले की, रात्री ३ वाजता त्याला आणि त्याच्या टीममधील अनेकांना अचानक जाग येत होती. रिसॉर्टच्या मॅनेजरला विचारल्यानंतरही काहीच कारण समजले नाही. शेवटी, त्यांनी शूटिंग पूर्ण करून तिथून निघण्याचा निर्णय घेतला.