परेश रावल कोणामुळे ‘हेरा फेरी ३’मध्ये पुन्हा परतले? निर्माते ‘ही’ नावं घेत म्हणाले…
'हेरा फेरी ३' चित्रपटाच्या वादानंतर परेश रावल पुन्हा चित्रपटात परतणार आहेत. त्यांच्या एक्झिटमुळे चाहत्यांमध्ये नाराजी होती, परंतु आता ते परतल्याने आनंद व्यक्त केला जात आहे. निर्माते साजिद नाडियाडवाला, अहमद खान आणि अक्षय कुमार यांच्या प्रयत्नांमुळे हा वाद मिटला. 'हेरा फेरी ३' २०२५ च्या अखेरीस प्रदर्शित होईल अशी अपेक्षा आहे.