“तो मला सोडून गेला”, प्रियांका चोप्राच्या पतीबद्दल एक्स गर्लफ्रेंडचं वक्तव्य; म्हणाली…
अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास यांच्याविषयी चर्चेत असतात. अशातच निक जोनास पुन्हा चर्चेत आला आहे; कारण त्याची एक्स गर्लफ्रेंड माइली सायरसने पॉडकास्टमध्ये त्यांच्या नात्याबद्दल प्रतिक्रिया दिली. माइलीने निकबरोबरच्या ब्रेकअपबद्दल सांगितलं आणि निक अजूनही आवडतो असं म्हटलं. २००६-०७ मध्ये ते डेट करत होते आणि २००९ मध्ये थोड्या काळासाठी एकत्र आले होते.