रितेश देशमुख-अजय देवगणच्या ‘रेड २’ ची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई, पार केला २०० कोटींचा गल्ला
'रेड २' चित्रपट १ मे २०२५ रोजी प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अजय देवगण आणि रितेश देशमुख यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने २४ दिवसांत २०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. पहिल्या दिवशी १९.७१ कोटींची कमाई करणाऱ्या 'रेड २'ने पहिल्या आठवड्यात ९५.७५ कोटी, दुसऱ्या आठवड्यात ४०.६ कोटी आणि तिसऱ्या आठवड्यात २०.५ कोटी कमावले.' रेड २'ने भारतात आतापर्यंत १५७.६९ कोटींची कमाई केली आहे. २३ व्या दिवशी चित्रपटाने १ कोटी रुपये कमावले आहेत.