रणबीर कपूर व आलिया भट्टचा आलिशान बंगला पाहिलात का? घराचा व्हिडीओ आला समोर
बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट व रणबीर कपूर यांचा वांद्रे येथील २५० कोटींचा आलिशान बंगला पूर्ण झाला आहे. सहा मजली बंगल्याभोवती हिरवागार परिसर असून, प्रत्येक मजल्यावर छोटी रोपं आहेत. बंगल्याचं नाव कृष्णराज आहे, जे रणबीरचे आजोबा राज कपूर व आजी कृष्णा कपूर यांच्या नावांचा मिलाफ आहे. लवकरच हे जोडपं त्यांच्या लेकीसह नवीन घरात राहायला जाणार असून, यंदाची दिवाळी तिथे साजरी करणार आहेत.