Video: बॉलीवूड अभिनेत्रीने गुपचूप उरकलं लग्न, ‘या’ कंपनीच्या CEO बरोबर थाटला संसार
बॉलीवूड अभिनेत्री शाजान पदमसीने तिच्या बॉयफ्रेंड आशिष कनाकियासोबत लग्न केलं आहे. ३७ वर्षीय शाजान आणि आशिष मागील काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. आशिष कनाकिया ग्रुपचे डायरेक्टर आणि मूव्ही मॅक्स सिनेमाचे सीईओ आहेत. शाजानच्या मित्रांनी लग्नातील खास क्षण इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. शाजानने अद्याप तिच्या लग्नासंदर्भात पोस्ट केली नाही. शाजानने ‘हाउसफूल 2’, ‘ऑरेंज’ यासह अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.