रणबीर कपूरच्याा ‘रामायण’चा संगीतकार हान्स झिमर कोण? बॉलीवूडमध्ये पहिल्यांदाच करतोय काम,
हान्स झिमर, प्रसिद्ध हॉलीवूड संगीतकार, आता बॉलीवूडमध्ये पदार्पण करीत आहेत. रणबीर कपूरच्या 'रामायण' चित्रपटासाठी त्यांनी संगीत दिलं आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटात रणबीर कपूर, साई पल्लवी, यश, आणि सनी देओल मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून, झिमर आणि ए. आर. रहमान यांच्या संगीताचं विशेष कौतुक होत आहे.