नाकात नथ, डोळ्यात राग अन्… रश्मिका मंदानाच्या नवीन चित्रपटातील थराराक लूकने वेधलं लक्ष
लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या 'कुबेरा' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता रश्मिकाने तिचा नवीन चित्रपट 'मैसा' ची घोषणा केली आहे. तिने सोशल मीडियावर पोस्टर शेअर केले असून, यात ती थरारक लूकमध्ये दिसत आहे. रश्मिकाने सांगितले की, हा चित्रपट तिच्यासाठी वेगळा अनुभव आहे. 'मैसा' हिंदीसह चार दाक्षिणात्य भाषेत प्रदर्शित होणार आहे.