सलमान खानच्या बॉडीगार्डने आमिरच्या मुलाला दिला धक्का
आमिर खानच्या 'सितारे जमीन पर' चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला सलमान खानसह अनेक कलाकार उपस्थित होते. यावेळी सलमानच्या बॉडीगार्डने आमिरचा मुलगा जुनैद खानला चुकून धक्का दिला. जुनैदने संयम दाखवत बॉडीगार्डशी बोलण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी त्याच्याशी हात मिळवून स्मित हास्य केलं. सलमानला मिळालेल्या धमक्यांमुळे त्याच्यासोबत नेहमी बॉडीगार्ड असतात. जुनैदने 'महाराज' चित्रपटातून पदार्पण केलं असून, आता 'एक दिन' चित्रपटात साई पल्लवीसोबत दिसणार आहे.