संजय आणि करिश्मा यांचं नातं तुटण्यामागे प्रिया सचदेव जबाबदार? बहीण मंदिराची प्रतिक्रिया
बॉलीवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचे एक्स पती संजय कपूर यांच्या निधनानंतर त्यांच्या प्रॉपर्टीवरून वाद सुरू आहे. संजय यांच्या तिसऱ्या पत्नी प्रिया सचदेव आणि करिश्मा कपूरच्या मुलांमध्ये ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून वाद आहे. संजय यांच्या बहिणी मंदिरा कपूर स्मिथ यांनी संजय आणि करिश्मा यांचं नातं तुटण्यामागे प्रिया जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. संजय आणि प्रियाच्या लग्नाला कुटुंबाचा विरोध होता. मंदिरा यांनी करिश्मासाठी ठामपणे उभं राहायला हवं होतं असंही कबूल केलं.