सतीश शाह यांच्या निधनानंतर सुमीत राघवनला अश्रू अनावर; ऑनस्क्रीन वडिलांच्या आठवणीत भावुक
लोकप्रिय ज्येष्ठ विनोदी अभिनेते सतीश शाह यांचं २५ ऑक्टोबर रोजी निधन झालं. 'साराभाई वर्सेस साराभाई'मधील इंद्रवदनच्या भूमिकेमुळे ते विशेष ओळखले जात. अभिनेता सुमीत राघवन यांनी एक भावुक व्हिडीओ शेअर करून सतीश शाह यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. सुमीतने सांगितलं की, शोमधील कलाकारांमध्ये घट्ट नातं होतं. सतीश शाह यांच्या निधनानंतर अनेकांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली.