‘सरदारजी ३’च्या वादावर निर्मात्यांची प्रतिक्रिया; हानिया आमिरबद्दल म्हणाले…
लोकप्रिय गायक-अभिनेता दिलजीत दोसांझच्या 'सरदारजी ३' चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर दिसल्याने प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला. दिलजीतने स्पष्ट केले की, चित्रपटाचे चित्रीकरण फेब्रुवारीत पूर्ण झाले होते, तेव्हा परिस्थिती वेगळी होती. निर्मात्यांनी चित्रपट भारतात प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला. निर्मात्यांनी सोशल मीडियावर पोस्टद्वारे सांगितले की, देशातील परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी हा निर्णय घेतला आहे.