शाहरुख खानने आईसाठी IIT ची प्रवेश परीक्षा केलेली पास; काय आहे ‘तो’ किस्सा
बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानने IIT ची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली होती, हे फार कमी लोकांना माहित आहे. शाहरुखने शाळेत विज्ञान घेतलं होतं, पण कॉलेजमध्ये अर्थशास्त्र शिकण्याचा निर्णय घेतला. त्याने दिल्ली युनिव्हर्सिटीतून अर्थशास्त्र आणि जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातून मास कम्युनिकेशन शिकलं. शाहरुखने आपल्या मुलाखतीत नमाज आणि आपल्या मुलांना आदराने वाढवण्याबद्दलही सांगितलं. सध्या तो 'किंग' सिनेमाच्या शूटमध्ये व्यग्र आहे, ज्यात त्याची लेक सुहानादेखील असणार आहे.