“शाहरुख खान सेटवर खुर्च्या उचलायचा…” ‘हाऊसफुल ५’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाचं वक्तव्य
बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान आणि चित्रपट निर्माता तरुण मनसुखानी यांची जुनी ओळख आहे. तरुणने शाहरुखसोबत 'कभी खुशी कभी गम', 'कल हो ना हो', 'कभी अलविदा ना कहना' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. एका मुलाखतीत तरुणने शाहरुखच्या सेटवरील वागणुकीबद्दल सांगितले. शाहरुख नेहमी टीमला मदत करत असे. सध्या शाहरुख 'किंग' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे, तर तरुण 'हाऊसफुल ५'च्या प्रमोशनमध्ये आहे.