शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या अडचणीत वाढ, पोलिसांकडून लुकआऊट नोटीस
अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्या अडचणी वाढत आहेत. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ६० कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी त्यांच्यावर लुकआऊट सर्क्युलर (LOC) जारी केले आहे. दीपक कोठारी यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांनी कर्ज आणि गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक केली. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.