‘शिल्पा शिरोडकरची गोळी घालून हत्या…’ अभिनेत्रीने सांगितला स्वत:च्या मृत्यूचा ‘तो’ प्रसंग
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरने १९९५ साली आलेल्या 'रघुवीर' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तिच्या मृत्यूच्या अफवा पसरवल्याचा खुलासा केला आहे. त्या वेळी तिच्या गोळ्या घालून हत्या झाल्याची बातमी पसरली होती. हे सर्व चित्रपट निर्माते गुलशन कुमार यांनी प्रमोशनल ट्रिक म्हणून केले होते. शिल्पा लवकरच तेलुगू चित्रपट 'जटाधारा' मध्ये दिसणार आहे, जो अनंत पद्मनाभ स्वामी मंदिराच्या गूढ कथेवर आधारित आहे.