“…तर हेमा मालिनी मिळणार नाही”, ‘शोले’चे दिग्दर्शक धर्मेंद्र यांना असं का म्हणालेले?
१९७५ साली प्रदर्शित झालेल्या 'शोले' चित्रपटानं भारतीय सिनेइंडस्ट्रीत इतिहास रचला. दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी चित्रपटाच्या कास्टिंगबद्दल अनुभव शेअर केले. अमिताभ बच्चन, संजीव कुमार आणि धर्मेंद्र यांनी गब्बरची भूमिका करायची इच्छा व्यक्त केली होती. सिप्पी यांनी सांगितलं की, अमजद खानशिवाय गब्बरची भूमिका कुणीच चांगली करू शकत नव्हतं. धर्मेंद्र-हेमा मालिनी आणि अमिताभ-जया बच्चन यांच्या खऱ्या आयुष्यातील प्रेमामुळे त्यांच्या केमिस्ट्रीला पडद्यावर फायदा झाला.