“त्याकाळी स्टार्टअपच होता”, निर्माते रोहन सिप्पी यांनी सांगितलं ‘शोले’च्या यशाचं गुपित
बॉलीवूडमधील 'शोले' हा १९७५ साली प्रदर्शित झालेला एक ऐतिहासिक चित्रपट आहे. यावर्षी 'शोले'ला ५० वर्षे पूर्ण झाली असून, या निमित्ताने इकॉनॉमिक टाइम्सचे पत्रकार राजेश एन. नायडू यांनी दिग्दर्शक रोहन सिप्पी यांच्याशी संवाद साधला. रोहन यांनी 'शोले'ला एक यशस्वी स्टार्टअप म्हटलं आणि त्याच्या यशाचं श्रेय त्यांच्या वडिलांच्या आत्मविश्वासाला दिलं. त्यांनी 'शोले'ला कमी पुरस्कार मिळाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं आणि अमिताभ बच्चन यांच्या भूमिकेचं कौतुक केलं. 'शोले' आजही एक रहस्य आहे, असं रोहन म्हणाले.