“जब तुम अकेले…”, श्रद्धा कपूरची पोस्ट चर्चेत; अभिनेत्रीने कोणासाठी लिहिली सुंदर कविता?
लोकप्रिय अभिनेत्री श्रद्धा कपूरने तिच्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सोशल मीडियावर तिचे दशलक्ष फॉलोअर्स आहेत आणि ती नियमितपणे पोस्ट शेअर करते. नुकतीच तिने प्रेमावर आधारित एक सुंदर कविता इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. श्रद्धा 'स्त्री २' आणि 'तू झूठी में मक्कार' या चित्रपटांमध्ये झळकली होती. ती लवकरच लक्ष्मण उतेकर यांच्या आगामी चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.