रेखा नाही तर ‘उमराव जान’साठी ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीला होती पहिली पसंती
लोकप्रिय अभिनेत्री रेखा यांचा 'उमराव जान' चित्रपट प्रदर्शित होऊन ४४ वर्षे झाली आहेत, परंतु अजूनही त्याची क्रेझ कायम आहे. मुझफ्फर अली यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाची कथा, गाणी आणि रेखाचे सादरीकरण प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिले आहे. सुरुवातीला स्मिता पाटीलला विचारण्यात आले होते, परंतु शेवटी रेखाने ही भूमिका साकारली आणि प्रेक्षकांची मनं जिंकली. चित्रपटाच्या प्रदर्शनाला ४४ वर्षाे झाल्यानिमित्ताने चित्रपटाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.