अभिनेत्रीला १६ व्या वर्षी झालेला PCOS, चेहऱ्यावरील केस आणि लठ्ठपणामुळे झालेली ट्रोल
बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर तिच्या स्पष्ट विधानांसाठी आणि फॅशनसाठी ओळखली जाते. आई झाल्यानंतर तिने अभिनयापासून ब्रेक घेतला असून सध्या ती मुलगा वायू आणि कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. सोनमला लहानपणी पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम (पीसीओएस)मुळे वजन वाढलं होतं आणि चेहऱ्यावरील केसांमुळे टीका व टोमणे सहन करावे लागले होते. यावेळी तिला आईने काजोलचा फोटो दाखवत आत्मविश्वास दिला होता. काजोलने दिलेल्या आत्मविश्वासाने प्रेरित होऊन सोनमने या आव्हानांचा सामना केला.