आता आपल्याला भाकरीचं कर्ज चुकवायचंय…; पंजाबमधील पुरग्रस्तांसाठी सोनू सूदचा मदतीचा हात
बॉलीवूड अभिनेता सोनू सूदने पंजाबमधील पूरग्रस्त गावांना भेट दिली आहे. त्याने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. पूरामुळे शेतं पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सोनूने गावकऱ्यांच्या अतिथीसेवेने भावुक होऊन सर्वांना एकत्र येऊन मदत करण्याचे आवाहन केले आहे. रणदीप हुड्डा, सलमान खान, शाहरुख खान यांसारख्या कलाकारांनीही मदतीचा हात दिला आहे.