“गोविंदाबरोबर वरुण धवनची तुलना करू नका”, सुनीता आहुजा यांचं वक्तव्य; म्हणाल्या, “तो अजून…”
प्रसिद्ध अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत वरुण धवनबद्दल वक्तव्य केलं आहे. सुनीता यांनी गोविंदा व वरुण धवन यांची तुलना करू नका असं सांगितलं आहे. वरुण धवन गोविंदाचा मोठा चाहता आहे, पण सुनीता यांच्या मते वरुणची गोविंदाशी तुलना करणं योग्य नाही. वरुणचं स्वतःचं वेगळेपण आहे आणि त्याला स्वतंत्र ओळख मिळावी असं सुनीता म्हणाल्या.