कमल हासन यांच्या ‘ठग लाईफ’ चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा
अभिनेते कमल हासन यांच्या 'ठग लाईफ' चित्रपटावर कर्नाटकात बंदी घालण्यात आली आहे. कमल हासन यांनी कन्नड भाषेबद्दल केलेल्या विधानामुळे हा वाद निर्माण झाला. सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटक सरकारला फटकारले असून, चित्रपटाचे प्रदर्शन करण्याची जबाबदारी राज्य सरकारची असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, चित्रपटाने आतापर्यंत ४७.०४ कोटी रुपयांची कमाई केली आहे.