“लग्न केलंस तर काम मिळणार नाही…”, लोकप्रिय अभिनेत्रीला निर्मात्याने दिलेला सल्ला; म्हणाली…
अभिनेत्री मानसी पारेखने तिच्या करिअरबद्दल अनुभव सांगितला आहे. तिला सुंदर नसल्यामुळे अभिनेत्री होऊ शकत नाही, असे सांगण्यात आले होते. तसेच, लग्न केल्यास काम मिळणार नाही, असेही सांगण्यात आले. मात्र, मानसीने गायक पार्थिव गोहिलसह लग्न केले आणि तिला एक मुलगी आहे. लग्नानंतर करिअर केल्याचं तिने सांगितलं आहे. मानसीने 'उरी', 'कच्छ एक्स्प्रेस' यांसारख्या चित्रपटांत काम केले असून तिला 'कच्छ एक्स्प्रेस'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.