“ऑडिशनसारखी फालतू कामं करत नाही…”, ऑडिशन मागितल्यामुळे रागावलेल्या उषा नाडकर्णी
उषा नाडकर्णी यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. 'गली बॉय' चित्रपटासाठी ऑडिशन देण्यास सांगितल्यावर त्यांनी नकार दिला. त्यांनी सांगितलं की, इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर ऑडिशन देणं अपमानास्पद आहे. त्यांनी दिग्दर्शकांच्या वागणुकीवर नाराजी व्यक्त केली.