अभिनेते प्रेम चोप्रा यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, आता कशी आहे प्रकृती? डॉक्टर म्हणाले…
बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आणि प्रेम चोप्रा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. धर्मेंद्र यांना उपचारांनंतर डिस्चार्ज मिळाला आहे. प्रेम चोप्रा यांना छातीत दुखत असल्याने ८ नोव्हेंबर रोजी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारांनंतर त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांनाही डिस्चार्ज देण्यात आला आहे. प्रेम चोप्रा यांनी सहा दशकांच्या कारकिर्दीत ३८० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.