विकी कौशलच्या वडिलांनी घेतलेला आत्महत्या करण्याचा निर्णय, ‘त्या’ प्रसंगाबद्दल म्हणाले…
शाम कौशल, बॉलीवूडमधील प्रसिद्ध अॅक्शन डिरेक्टर आणि विकी कौशल व सनी कौशलचे वडील, यांना २००३ साली कर्करोगाचे निदान झालं होतं. 'लक्षया' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांना पोटात दुखत होतं. तेव्हा डॉक्टरांनी त्यांना फार काळ जगणार नसल्याचे सांगितले होते. शस्त्रक्रियेनंतर त्यांनी आयुष्याकडे सकारात्मक दृष्टिकोनाने पाहायला सुरुवात केली. आज ते कर्करोगमुक्त असून त्यांच्या आयुष्यात अनेक चांगले बदल झाले आहेत.