वडील ख्रिश्चन, भाऊ मुस्लीम; विक्रांत मॅसीने मुलाच्या धर्माबाबत घेतला ‘हा’ निर्णय, म्हणाला…
अभिनेता विक्रांत मॅसीने आपल्या मुलाच्या धर्माबद्दल घेतलेल्या निर्णयाबद्दल सांगितले. विक्रांतचे वडील ख्रिश्चन, आई शीख, मोठा भाऊ मुस्लिम आणि पत्नी हिंदू आहे. विक्रांतने मुलाच्या जन्म प्रमाणपत्रात धर्माचा उल्लेख केलेला नाही. त्याने सांगितले की, धर्म हा वैयक्तिक निर्णय असावा आणि प्रत्येकाला आपला धर्म निवडण्याचा अधिकार आहे. विक्रांत लवकरच 'आँखों की गुस्ताखियां' चित्रपटात दिसणार आहे.