“आलिया भट्टला करण जोहरमुळे…”, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचं वक्तव्य; म्हणाली…
अभिनेत्री वामिका गब्बीने आलिया भट्टला करण जोहरचा कायम पाठिंबा मिळत आला असल्याचे म्हटले आहे. वामिकाने नयनदीप रक्षितला दिलेल्या मुलाखतीत, तिलाही करण जोहरसारख्या व्यक्तीचा पाठिंबा मिळावा असे वाटते, असे सांगितले. करण जोहरने आलियाला इंडस्ट्रीत लाँच केले आणि तिच्या करिअरमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. यापूर्वी ऐश्वर्या रायनेही आलियाला करणचा पाठिंबा मिळाल्याचे मान्य केले होते.