कोण होता संजय कपूर? ३ लग्नं, ४ मुलं अन्…; करिश्मा कपूर होती दुसरी बायको, इतर दोघी कोण?
करिश्मा कपूरचा पूर्व पती आणि सोना स्टारचा चेअरमन संजय कपूरचे १२ जूनला हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तो ५३ वर्षांचा होता. संजयला पोलो खेळताना झटका आला आणि त्याला वाचवता आले नाही. करिश्मा व संजयचा घटस्फोट झाला असला तरी, मुलं संजयच्या जवळ होती. संजयने तीन लग्नं केली होती आणि त्याला चार मुलं होती. करिश्मा व संजयच्या मुलांची कस्टडी करिश्माकडे आहे.