AI मुळे Amazon मधल्या ३० हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, कंपनीत सर्वात मोठी नोकरकपात!
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आल्यानंतर नोकऱ्यांवर परिणाम होणार असल्याची चर्चा होती. आता AIमुळे नोकऱ्या जात असल्याचं चित्र दिसत आहे. अॅमेझॉनने ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. हे अॅमेझॉनमधील सर्वात मोठे नोकरकपात ठरणार आहे. अॅमेझॉनचे सीईओ अँडी जेस्सी यांनी करोना काळात कर्मचारी कपातीचा कार्यक्रम जाहीर केला होता.