अनिल अंबानी ईडीच्या रडारवर; आधी छापे, आता ३ हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी चौकशी होणार!
आठवड्याभरापूर्वी मुंबईतील ३५ ठिकाणी ईडीनं छापेमारी केली, जी अनिल अंबानी यांच्याशी संबंधित होती. चौकशीनंतर ईडीनं अनिल अंबानी यांना ३ हजार कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी समन्स बजावलं आहे. ईडीच्या मते, या घोटाळ्यात अनिल अंबानी यांच्या रिलायन्स अनिल धिरूभाई अंबानी ग्रुपच्या कंपन्यांचा सहभाग आहे.