RBI Repo Rate: आरबीआयचा मोठा निर्णय, रेपो रेट ५० बेसिस पॉइंटने घटवले!
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) MPC बैठकीत रेपो रेट ५० बेसिस पॉइंटने कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ही माहिती दिली. यामुळे व्याजदर ६ टक्क्यांवरून ५.५ टक्क्यांवर आले आहेत. सलग तिसऱ्यांदा व्याजदरात कपात झाल्यामुळे भारतीय बाजारपेठेत सकारात्मक परिणाम दिसण्याची शक्यता आहे. महागाई दर चालू आर्थिक वर्षासाठी ३.७ टक्के राहील, असेही सांगण्यात आले.