UPI digital payment benefit युपीआय व्यवहारांची वाढती मर्यादा किती फायदेशीर?
युपीआय डिजिटल पेमेंटसाठी भीम, गुगलपे, फोनपे यासारख्या अॅप्सचा वापर वाढत आहे. एनपीसीआयने युपीआय पेमेंटसाठी प्रती व्यवहार व प्रतीदिन मर्यादा ठरवली होती, परंतु आता काही ठराविक प्रकारच्या पेमेंटसाठी ही मर्यादा वाढवली आहे. पी टू एम व्यवहारांसाठी मर्यादा वाढवून रु.५ लाखांपर्यंत केली आहे, तर पी टू पी व्यवहारांसाठी रु.१ लाख प्रती दिन मर्यादा कायम आहे. यामुळे पेमेंटची सहजता व सुरक्षितता वाढेल.