‘सोन्याची वाढती किंमत एक मोठा धोका’, श्रीधर वेम्बू यांचा इशारा? नेमकं काय म्हणाले?
जगभरात आणि भारतात सोन्याच्या दरात वाढ होत आहे. झोहो कॉर्पोरेशनचे सह-संस्थापक आणि सीईओ श्रीधर वेम्बू यांनी यावर प्रतिक्रिया देत, सोन्याच्या दरातील वाढ ही जागतिक वित्तीय व्यवस्थेमधील चिंतेचे संकेत असल्याचे म्हटले आहे. अमेरिकन शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे मोठे नुकसान होऊ शकते, असे गीता गोपीनाथ यांच्या मताचे समर्थन करताना, वेम्बू यांनी सोन्याला गुंतवणूक म्हणून नव्हे तर आर्थिक जोखमीच्या काळातील विमा म्हणून पाहावे, असे सुचवले आहे.