आज दिवाळीच्या दिवशी शेअर बाजार सुरू आहे का? मुहूर्त ट्रेडिंग कधी? जाणून घ्या सर्व माहिती
आज भारतात दिवाळी साजरी होत आहे. या सणाच्या निमित्ताने भारतीय शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंगचा उत्साह असतो. आज (सोमवार, २० ऑक्टोबर) बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज खुले असतील. मात्र, उद्या २१ ऑक्टोबर रोजी शेअर बाजार बंद राहील. मंगळवारी एक तासाचे विशेष मुहूर्त ट्रेडिंग सत्र असेल. २०२५ मध्ये बीएसई आणि एनएसईमध्ये १४ अधिकृत सुट्ट्या आहेत.